adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राजश्री पाटील यांनी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.!! कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख...!!

 राजश्री पाटील यांनी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.!!  कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख...!!  सौ. अश्विनी लो...

 राजश्री पाटील यांनी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.!!  कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख...!! 


सौ. अश्विनी लोमटे-यादव ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सध्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बदल्यांचे वातावरण चांगलेच पाहायला मिळत आहे. मागीलच दोन दिवसांपूर्वी पोलीस उपअधीक्षक ( डीवायएसपी ) दर्जेतील अधिकाऱ्यांच्या राज्य गृह विभागाकडून बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण वडूज दहिवडी कोरेगांव कराड या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या होत्या.  या मध्ये कराड तालुक्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल जी. ठाकूर  यांनी कराड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नेहमीच प्रयत्नशील, राहिलेले डॉ.अमोल ठाकूर यांची ठाणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नतीने बदली झाली असुन. त्यांच्या रिक्त जागेवर सांगली पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरुची येथून पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांची नियुक्ती झाली असून त्यांनी त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या आदेशावरून कराड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून शनिवारी पदभार स्वीकारला आहे. यावेळी कराड तालुका कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. राजश्री संभाजीराव पाटील यांनी आजपर्यंत विविध पदावर काम पाहिले आहे. कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात ओळखले जाते. सातारा जिल्हा पोलीस दलात नव्याने आणि प्रथमच त्यांची नियुक्ती कराड तालुक्यांच्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राज्य गृह विभागाकडून करण्यात आली आहे. कराड तालुक्यांच्या नूतन (डीवाय एसपी ) राजश्री संभाजीराव पाटील मॅडम यांना रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन शुभेच्छा आहेत. कराड तालुक्यांचे (डीवाय एसपी) डॉ. अमोल ठाकूर यांनी उपविभागात चांगलेच काम केले त्यांच्या कार्यकाळात ड्रग्ज कोकेन यासारख्या मोठ्या कारवाया त्यांनी करून पोलीस दलाची मान उंचावली त्याचबरोबर शहरांतील लोकांचा पोलिसांची सुसंवाद वाढवा माहितीचे स्त्रोत बळकट करण्यासाठी देखील आमोल ठाकूर नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्याचबरोबर मॅरेथॉनचे आयोजन देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये झाले, यावेळी सुमारे साडेतीन हजार कराडकरांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. सातारा जिल्हा पोलीस दलात नेहमीच प्रयत्नशील राहिले डॉ. अमोल ठाकूर यांनाही रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन शुभेच्छा आहेत.

No comments