श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल,चांगदेव येथे रक्षाबंधन निमित्त चांगदेवच्या विद्यार्थीनीनी सैनिकांना पाठवल्या राख्या मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गा...
श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल,चांगदेव येथे रक्षाबंधन निमित्त चांगदेवच्या विद्यार्थीनीनी सैनिकांना पाठवल्या राख्या
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल,चांगदेव येथे रक्षाबंधन निमित्त एक नविन उपक्रम गजानन निंबाळकर,मयुर महाजन,राजू साळी सर यांच्या संकल्पनेतून भारतीय जवानांना इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी कडून राख्या पाठवण्यात आल्या. यांमध्ये सर्व विद्यार्थीनीनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देण्यात आला.
शाळेतील राख्या गोळा करतांना शाळेचे मुख्याध्यापक विजय चौधरी सर,पर्यवेक्षक जे.व्हि.सोनवणे सर आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.सदर राख्या जिल्हा सैनिक कार्यालय जळगांव येथील अधिकारी साहेब यांच्या कडे सुपुर्त करण्यात आल्या.सर्व दूर शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


No comments