adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रहार जनशक्ती पक्षाच्या बहिणींनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक स्वरूपात काळ्या राख्या बांधून निषेध नोंदवित आमच्या शेतकरी भाऊरायाला या संकटातून बाहेर काढा अशी घातली साद

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या बहिणींनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक स्वरूपात काळ्या राख्या बांधून निषेध नोंदवित आमच्या शेतकरी भाऊरा...

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या बहिणींनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक स्वरूपात काळ्या राख्या बांधून निषेध नोंदवित आमच्या शेतकरी भाऊरायाला या संकटातून बाहेर काढा अशी  घातली साद 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर: शासनाकडे ‘लाडक्या बहिणीं’ ना दरमहिन्याला १५०० रूपये देण्यासाठी पैसा आहे, मात्र आमच्या शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे. अस्मानी, सुल्तानी संकटाने शेतकरी बांधव भरडला जात असून दररोज कोठे ना कोठे शेतकरी आत्महत्या होतच आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ६ लाख शेतकरी बांधवांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. तेव्हा ही आत्महत्येची शोकांतीका थांबविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या बहिणींनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक स्वरूपात काळ्या राख्या बांधून निषेध नोंदवित आमच्या शेतकरी भाऊरायाला या संकटातून बाहेर काढा अशी साद घातली.


आज रक्षाबंधन निमित्त शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांनी शेतकरी बांधवांच्या होत असलेल्या आत्महत्या अन् शासन शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे व त्यांच्या समस्यांकडे वेळोवेळी करीत असलेले दुर्लक्ष. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने शेतकर्‍यांचा ७/१२ कोरा करण्याचे दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडल्याने देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक स्वरूपात भाऊराया म्हणून त्यांना टिळा लावून औक्षण करून काळ्या राख्या बांधल्या. तसेच आम्हाला तुमच्याकडून कोणतीही ओवाळणी नको तर आमचे शेतकरी बांधवांना तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करा अन् त्यांच्या असलेल्या समस्या तातडीने सोडवून त्यांचा ७/१२ कोरा करा अशी आर्त हाक घातली. 

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांसह उपजिल्हाप्रमुख अजय टप, तालुकाप्रमुख अजित फुले शहर प्रमुख शालिग्राम पाटील, शहर उपप्रमुख बळीराम बावस्कर, राहुल तायडे, अशोक गाढवे, संजय इंगळे, अजाबराव वाघ आणि असंख्य महिला उपस्थित होत्या. 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दरवर्षी रक्षाबंधना निमित्त शहरातील काही महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येतो. त्याअनुषंगाने आज रक्षा बंधनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थिती बहिणींना रक्षा बंधनाची भेट म्हणून साड्या वाटप करण्यात आल्या.

No comments