भुसावळ येथील उपकोषागार कार्यालय स्तरावरून नोटरी तिकीट पुरवठा उप कोषागार अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते. मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश ग...
भुसावळ येथील उपकोषागार कार्यालय स्तरावरून नोटरी तिकीट पुरवठा उप कोषागार अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते.
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ येथील उपकोषागार कार्यालय स्तरावरून नोटरी तिकीट पुरवठा आज दिनांक:- 06/08/2025 रोजी एडवोकेट भूपेश बाविस्कर यांचे अधिकृत प्रतिनिधी राजेंद् त्रंबक वानखेडे यांना प्रथमतः नोटरीचे तिकीट वाटप करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा कोषागार अधिकारी माननीय राजेंद्र खैरनार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तालुकास्तरावर नोटरी तिकीट विक्री बाबत सूचित करण्यात आलेले आहे. जेणेकरून जनतेची गैरसोय होणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात यावी, याबाबत सूचना आहे. त्यानुसार भुसावळ येथील उपकोषागार अधिकारी रवींद्र गायकवाड व कनिष्ठ लेखापाल विवेकानंद चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच यापूर्वी अनेक वर्षापासून जळगाव जिल्हा कोषागार कार्यालय येथे संबंधित तालुक्यातील वकील बांधवांना नोटरी तिकीट घेण्यासाठी जावे लागत होते. ते आता शासनाच्या वतीने तालुकास्तरावर उपकोषागार कार्यालय स्तरावरून नोटरी तिकीट पुरवठा करण्यात येणार आहे. तरी भुसावळ तालुक्यातील अधिकृत लायसन धारक नोटरी तिकीट वकील बांधवांना यापुढे जळगाव येथे न जाता भुसावळ कार्यालय येथे नोटरी तिकीट मुद्रांक साठा उपलब्ध झालेला असून आपण आपली मागणी नोंदवून उपलब्धते प्रमाणे नोटरी टिकीट आपल्या कार्यालयाच्या स्तरावरून वितरित करण्यात येईल अशी माहिती, भुसावळ येथील उप कोषागार अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी कळविलेले आहे.

No comments