अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा आंदोलन स्वराज्य पक्षाचा इशारा अमोल बावस्कार बुलढाणा (संपा...
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या
अन्यथा आंदोलन स्वराज्य पक्षाचा इशारा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा, (दि.१८) ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. थार, खापरखेड, भांबेरी, मनब्दा, दापुरा, निंबोळी, दहिगाव, पंचगव्हान, वळगाव, नर्शीपुर, निंबोरा, मनात्री, आडसुल, नेर सांगवी, उमरी, तळेगाव डवला, तळेगांव पातुर्डा, बाबुळगाव, वांगरगाव, पिंदवळ यासह अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना तातडीने मदतीची गरज आहे.स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शासनाला या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. "शेतकऱ्यांचे कापूस आणि सोयाबीन हे प्रमुख पिके उद्ध्वस्त झाले आहेत. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी. जर शासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल असे प्रशांत डिक्कर यांनी ठणकावून सांगितले. शेतकऱ्यांचे हाल पाहता आता कोणताही विलंब सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तयार आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी स्वराज्य पक्षाचे प्रशांत डिक्कर, कुलदीप बाजारे,प्रतीक पात्रीकर,अक्षय भुजबले, श्याम मोहे, चेतन पिंपळकार,मयूर राऊत गणेश आमले, शुभम चिंचोलकर,रुपेश निमकर्डे, राजेश वाकोडे, राजेश अंजनकार,अक्षय अस्वार, नितीन भातुरकर यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..

No comments