adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मतदार राजा जागा हो… विकासाच्या धागा हो – अजय टप यांचे आवाहन

 मतदार राजा जागा हो… विकासाच्या धागा हो – अजय टप यांचे आवाहन  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर (जि. बुलढाणा) – येण...

 मतदार राजा जागा हो… विकासाच्या धागा हो – अजय टप यांचे आवाहन 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर (जि. बुलढाणा) – येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे बुलढाणा जिल्हा उपप्रमुख व पत्रकार अजय टप यांनी जनतेस उद्देशून जाहीर आवाहन केले आहे.

आपल्यावर विश्वास दाखवून मतदारांनी खासदार, आमदार, नगरसेवक निवडून दिले. त्यातून शहरात सुशोभित रस्ते, उत्तम नाले, नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. मात्र, आजही नागरिकांना या गोष्टींसाठी वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

अजय टप यांनी पुढे सांगितले की, “खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या, जनतेचा प्रश्न सोडवणाऱ्या, कर्तव्यदक्ष उमेदवारांचीच निवड होणे आवश्यक आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांत अशा उमेदवारांना संधी देऊनच आपला सर्वांगीण विकास साधता येईल.” त्यामुळे सर्व मतदारांनी सजग राहून विकासाभिमुख उमेदवारांची निवड करून शहराच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments