बहुजन समाज पाटीॅ चोपडा विधानसभेची आढावा बैठक संपन्न व कार्यकारणी जाहीर. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बसपाची आज रोजी चोपडा ...
बहुजन समाज पाटीॅ चोपडा विधानसभेची आढावा बैठक संपन्न व कार्यकारणी जाहीर.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बसपाची आज रोजी चोपडा विधानसभेची आढावा बैठक तथा कार्यकारणी ही जळगाव जिल्हा अध्यक्ष भिमराव आनंदा खैरे आणि जि. महासचिव सचिन अशोक बाविस्कर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखालील व जि. प्रभारी भाईदास दामू बाविस्कर , जि. सचिव मंगेश पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. चोपडा विधानसभेची नवीन कार्यकारणी देखील ह्या आढावा बैठकीत जाहीर करण्यात आली.चोपडा विधानसभाध्यक्ष सुरेश मोतीराम बारेला , चोपडा विधानसभेचे उपाध्यक्ष वासुदेव गोमा भिल, चोपडा विधानसभा सचिव विश्राम शामा बारेला , व सेक्टर अध्यक्ष अर्जुन विश्राम ठाकरे,
सेक्टर उपाध्यक्ष बारकु पाटील , इ पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. बहुजनांची नेत्री बहन कु.मायावतीजींनी आपल्या चार चार वेळेच्या शासनकाळा मध्ये जी ऐतिहासिक कामगिरी केली त्या कामगिरीला तोड नाही. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय च्या नितीवर, तत्वावर काम केले. कोणत्याही प्रकारे सांप्रदायिक घटना होऊ दिल्या नाहीत कींवा हिंदु मुस्लिम दंगली होऊ दिल्या नाहीत. असे कायद्याचे राज्य खऱ्या अर्थाने चालवून प्रत्येक व्यक्तीस न्याय दिला कोणत्याही प्रकारचे पक्षपात न करता असे सक्षम पध्दतीने काम केले की त्या केलेल्या कामांना अजून पर्यंत कोणी तोड नाही देऊ शकले नाही. मानवतावाद व महापुरूषांची चळवळ मोठी केली. त्यांचा इतिहास उजार केला. हे बसपा च्या एका राज्याच्या शासनकाळात कामे केली गेली. आपण गट तटाच्या भानगडीत न पडता बसपा ला मजबूत केले तर भारतासह महाराष्ट्रात देखील असे समानतेचे, कायद्याचे राज्य आणु व व प्रत्येकाला न्याय हक्क अधिकार मिळवून देऊ. असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष खैरे व जि. महासचिव बाविस्कर यांनी केले.

No comments