adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न

 यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न   भरत कोळी यावल (प्रतिनिधी)- (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  येथील जळगाव जिल...

 यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न  


भरत कोळी यावल (प्रतिनिधी)-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत प्रा.एस.आर. मोरे यांचे व्याख्यान संपन्न झाले.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम.डी.खैरनार हे प्रमुख पाहुणे तर रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.डी.पवार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत चौथे पुष्प गुंफतांना प्रा.एस.आर.मोरे यांनी शिक्षणाचे तत्वज्ञान वेगवेगळ्या तज्ञांनी वेगवेगळे सांगितलेले आहे.यात फ्रोबेल,प्लेटो,रूसो, मेरी मोन्टेसरी, जॉन डुई हे पाश्चात्य विचारवंत आहेत तर स्वामी विवेकानंद,महात्मा गांधी,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय तत्ववेत्ते व शिक्षणतज्ञ आहेत यांनी शिक्षणाद्वारे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी शिक्षणाच्या ज्या-ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रा.डॉ.आर. डी. पवार यांनी सदविवेक विचाराने व्यक्तिमत्व विकास होऊन ज्ञान वृद्धिंगत होते. ज्ञानवंत,विचारवंत यांच्या विचारांचे मनन, चिंतन करून चांगला समाज घडवता येतो असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रबोधिनीच्या समन्वयिका प्रा.डॉ.वैशाली कोष्टी यांनी केले, तर आभार प्रा.अर्जुन गाढे यांनी मानले.यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक उपस्थित होते.

No comments