वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले सावेडी उपनगरात घडली घटना सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.८):- शहर...
वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले सावेडी उपनगरात घडली घटना
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.८):- शहरातील सावेडी उपनगरात कविजंग परिसरात पहाटेच्या सुमारास वॉकिंगहून परतणाऱ्या एका ६० वर्षीय वृध्द महिलेला धक्का देत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीताबाई दिनेशकुमार मंडल (वय ६०,रा. कविजंग नगर,गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार,सीताबाई नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.६) रोजी पहाटे ५.३० वाजता वॉकिंगसाठी गेल्या होत्या. मारूती मंदिर,नवलेनगर येथे देवदर्शन करून परत येत असताना मंदिराबाहेर काही अंतरावर गेल्यावर अनोळखी इसमाने त्यांच्या मागून येत अचानकपणे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.सीताबाई यांनी आरडाओरडा करत चोरट्यांचा पाठलाग केला.परंतु संबंधित इसमाने काही अंतरावर लावून ठेवलेली दुचाकी चालू करून पसार झाला,असे फिर्यादीत म्हटले आहे.

No comments