adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई ; एकूण आठ वाळू माफियांना एक वर्षासाठी केले तडीपार..!!

  पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई ; एकूण आठ वाळू माफियांना एक वर्षासाठी केले तडीपार..!!   सौ. संगीता इंनकर (सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी....

 पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई ; एकूण आठ वाळू माफियांना एक वर्षासाठी केले तडीपार..!!  


सौ. संगीता इंनकर (सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पंढरपूर तालुक्यांतील वाळू माफीया यांच्याविरोधांत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काढलेल्या  आदेशाप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ( 55 ) अनुसार खालील नमूद वाळूमाफियांना सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी (दि. 28) (ऑगस्ट 2025) रोजी निर्गमित केले होते. त्या अनुषंगाने तडीपार करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे 

खालील प्रमाणे हद्दपार टोळीतील

  १) पंकज पांडूरंग कोळेकर (वय ३३) २) हिंमत अनिल कोळेकर (वय ३० ) ३) विनोद अर्जुन कोळेकर (वय ३५ ) ४) संतोष दगडू चव्हाण (वय ४६ )अ क १ ते ४ रा. कोळेकर वस्ती गुरसाळे ता. पंढरपूर 

५) आकाश उर्फ अक्षय भगवान घाडगे (वय २८ ) रा. देगाव ता. पंढरपूर)

 ६) धनाजी रामचंद्र शिरतोडे (वय ३४ )वर्षे रा. गुरसाळे ता. पंढरपूर )

७) महेश दिगंबर शिंदे (वय २८) सहयाद्री नगर इसबावी ता. पंढरपूर)

 ८) सोमनाथ अरुण लोंढे (वय ३४) रा. कौठाळी ता. पंढरपूर असे एकूण आठ वाळूमाफियांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून 

एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे यांच्याविरुद्ध वाळू चोरीचे अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल होते त्या अनुषंगाने  वरील आठ  व्यक्तींना पंढरपूर तालुका पोलिसांनी आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी ताब्यात घेऊन त्यांची सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये पुणे सातारा सांगली या जिल्ह्यात तेथील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सोडून तडीपाडीच्या अंमलबजावणी केलेली आहे सदर तडीपार केलेल्या आठ जणांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मारामारीचे वाळू चोरीचे सरकारी कामात अडथळा आणल्याचे धमकी दिल्याचे गुन्हे दाखल आहेत

सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, सहाय्यक उपनिरीक्षक विजू गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक आबा शेंडगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल घंटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद, पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर गवळी, पोलीस हवालदार मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम चालक पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाफ घाडगे चाटे यांच्या पथकांने सदरची कारवाई केली आहे.

No comments