वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेतील रजिस्टरांची केली बुकबाईडींग ; पाटील कुटुबांचे सर्वत्र कौतुक भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेतील रजिस्टरांची केली बुकबाईडींग ; पाटील कुटुबांचे सर्वत्र कौतुक
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील मनवेल येथील रहिवाशी असलेल्या पाटील कुंटूबांच्या ऑगस्ट महिन्यात चार व्यक्तीच्या वाढदिवस होता व त्या वाढदिवसाचा खर्च टाळून त्या पैशात मनवेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अति महत्वाचे असलेले शाळा सोडल्याचा दाखला व नाव दाखल केलेले नमुना नं. १ ते ८ रजिस्टरांची बुक बाईडींग व लेमीनिशन करून दिल्याने त्या पाटील कुटूंबांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मनवेल येथील जिल्हा परिषद प्राथामिक शाळेची स्थापना होऊन शंभर वर्ष पुर्ण झाले असून शाळेचा स्थापने पासून तर आज तागायत शाळेत नाव दाखल करण्यात येणारे रजिस्टर म्हणजे नमुना नं. १ पासून तर आतापर्यंत १३ रजिस्टर भरली आहे त्यात नमुना नंबर एक ते ८ नंबर असलेले जुन्या नोंदीचे रजिस्टर अतिशय जीर्ण झाले होते कुणाला जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे करीता आवश्यक दाखला लागला तर नाव शोधणे साठी मोठी कसरत करावी लागत होती त्याकरीता शाळेतील मुख्याध्यापक असलेल्या संगीता छगन पाटील यांच्या आई गुंढर बाई पाटील, वडील छगन पाटील, बहिण सौ. शितल पाटील व दिर प्रशांत पाटील यांचा ऑगस्ट महिन्यात चारही जनांचा वाढदिवस असून त्या वाढदिवसाच्या खर्च केक व इतर वस्तू वर खर्च नकरता शाळेतील नमुना नंबर १ ते ८ रजिस्टराची सर्व पाने लॅमिनेशन करून रजिस्टर पुर्णपणे बुकबाईडींग करून दिली त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे
No comments