जळगाव येथे "धरती आबा ,"जन भागीदारी अभियान व प्रधानमंत्री जनजागृती आदिवासी न्याय महा अभियान योजना आढावा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा...
जळगाव येथे "धरती आबा ,"जन भागीदारी अभियान व प्रधानमंत्री जनजागृती आदिवासी न्याय महा अभियान योजना आढावा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके उपस्थितीत संपन्न
प्रतिनिधी: खालिल आर तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या (सबका साथ सबका विकास सबका विश्वास) या संकल्पनेनुसार अनुसूचित जाती बहुल गावांमध्ये आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात येत असून. जळगाव जिल्ह्यात आज राबविण्यात येत असलेल्या धरती आबा जन भागीदारी अभियान, व प्रधानमंत्री जनजागृती, आदिवासी न्याय अभियान योजना, या दोन योजनांच्या आढावा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, व आदिवासी विकास मंत्री. डॉक्टर अशोक उईके, यांनी घेतला तसेच वन हक्क दावे, वन अतिक्रम, इतर अनुषंगिक या विषयांवर चर्चा करण्यात येऊन आदिवासी विकास विभाग मंडळ शबरी आदिवासी वित्त महामंडळ व सर्वसाधारण वैयक्तिक लाभाच्या योजनांचा आढावा घेऊन योजना योग्यरीत्या राबविण्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आमदार राजू मामा भोळे आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे आमदार चंद्रकांत पाटील जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल उपस्थित होते.

No comments