adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोक्यातील पाहिजे असलेला आरोपी जेरबंद..तब्बल बारा गुन्हे नोंद असलेला आरोपी शिताफीने अटक नेवासा पोलिसांची कारवाई

 मोक्यातील पाहिजे असलेला आरोपी जेरबंद..तब्बल बारा गुन्हे नोंद असलेला आरोपी शिताफीने अटक नेवासा पोलिसांची कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपा...

 मोक्यातील पाहिजे असलेला आरोपी जेरबंद..तब्बल बारा गुन्हे नोंद असलेला आरोपी शिताफीने अटक नेवासा पोलिसांची कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर  (दि.7):-सन 2011 पासुन नेवासा,श्रीरामपूर व कोपरगाव तिन तालुक्यामध्ये चोरी,जबरी चोरी,घरफोडी,दरोडा,दरोड्याची तयारी इत्यादी 12 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला चपळ व खतरनाक आरोपी डीचन त्र्यंबक भोसले रा.सलाबतपुर,ता. नेवासा यास नेवासा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.मागील चार वर्षांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,पोलीस ठाणे नेवासा तसेच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील पथके सदर आरोपीच्या मागावर होती.परंतु आरोपी हा मोठा चपळ असून घरी न झोपता शेत मळ्यांनी लपून-छपून राहायच्या. रात्रीच्या वेळी केळी, डाळिंब बागांमध्ये किंवा ऊसाच्या फडामध्ये झोपून राहायचा. पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या नियोजनाखाली मागील काही दिवसापासून नेवासा पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने सलाबतपुर, वरखेड भागामध्ये उसाच्या केळीच्या व सोयाबीनच्या शेतामध्ये दिवसभर काम करून माहिती काढली. बुधवारी सलाबतपुर येथील एका पेट्रोल पंपावर मोटर सायकलमध्ये पेट्रोल भरताना दिसून आला असता त्याला पोलिसांची भनक लागताच त्याने मोटर सायकल सोडुन धुम ठोकली. पोलिसांनी सुमारे अडीच किलोमीटर पाठलाग करून त्यास चिखलामध्ये सीताफिने जेरबंद केले. सदर वेळी आरोपीकडून एक पल्सर मोटर सायकल देखील जप्त करण्यात आली आहे.सदर आरोपी फिंगरप्रिंट तंत्रज्ञानद्वारे पोलीस ठाणे नेवासाकडील सौंदाळा व तरवडी येथील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये देखील वॉन्टेड होता.सदर आरोपीकडून पोलीस ठाणे नेवासा कडील आणखी काही चोरी जबरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे, अमोल साळवे, गणेश जाधव व सुनिल गंगावणे यांनी केली आहे.

No comments