adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

करमाळा पोलीस ठाणेचे अधिकारी,कर्मचारी जेवायला थांबले, वाठार स्टेशन भागांतून आरोपींने ठोकली धूम..!!

 करमाळा पोलीस ठाणेचे अधिकारी,कर्मचारी जेवायला थांबले, वाठार स्टेशन भागांतून आरोपींने ठोकली धूम..!!  सौ. कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिन...

 करमाळा पोलीस ठाणेचे अधिकारी,कर्मचारी जेवायला थांबले, वाठार स्टेशन भागांतून आरोपींने ठोकली धूम..!! 


सौ. कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सोलापूर ग्रामीण विभागातील करमाळा पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला करमाळ्याकडे घेवुन जात असताना कोरेगांव तालुक्यांतील तडवळे संमत वाघोली हद्दीत फौजी ढाब्यावर पोलीस जेवणासाठी थांबले होते यावेळी आरोपी सागर राम गायकवाड (वय 24 ) यांने लघुंशकेचा बहाणा केला आणि तिथून पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पळून गेला, सागर राम गायकवाड (वय 24) रा. निपाणी वडगांव ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर सध्या राहणार मत्यापूर सातारा) असे या पलायन केलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत वाठार स्टेशन पोलीस ठाण्याकडूंन मिळालेल्या माहितीवरून करमाळा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रोहित शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत गुरुवारी आरोपीला करमाळ्याकडे घेवुन निघाले होते. यावेळी प्रवासात पोलीस आदर्की फाटा फौजी येथे जेवणासाठी थांबले असता. तिथून लघुशंकेचा बहाणा करीत आरोपींने धूम ठोकली आहे. आपल्या विरोधांत सुरू असलेल्या कारवाईत अटक होऊ नये. या करिता सुरू असलेल्या पाऊस,वारा,चिखल आणि अंधारांची संधी साधत फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सागर राम गायकवाड ने पोलिसांच्या हातावर तुरी दिली आहे. सदर आरोपींने केलेल्या  पयलानामुळे वाठारच्या परिसरांत वाऱ्यासारखी बातमी पसरली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments