adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेंदुर्णी घटनेचा पँथर सेनेतर्फे तीव्र निषेध – दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

 शेंदुर्णी घटनेचा पँथर सेनेतर्फे तीव्र निषेध – दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा    रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 शेंदुर्णी घटनेचा पँथर सेनेतर्फे तीव्र निषेध – दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा  




 रावेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेंदुर्णी व बेटावद (ता.जामनेर) येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी 1) शेंदुर्णीतील पुतळा विटंबना प्रकरणात दोशींवर तीव्र व कठोर कारवाई करावी.2 ) सुलेमान खान यांच्या वरती  चा गुन्हा गंभीरपणे तपासून पूर्ण मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा 3 ) दोन्ही घटनांचा फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी करत आज रावेर येथे ऑल इंडिया पँथर सेना तर्फे तहसीलदार कार्यालय व रावेर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष विनोद मोरे, युवा तालुका अध्यक्ष जितू इंगळे, उपतालुका अध्यक्ष श्रावण भालेराव, रावेर शहर अध्यक्ष आदित्य गजरे, भारत बारेला शेख अरबाज सुभान तडवी इमरान खान जाफरखान तसेच इतर समाज बांधव पण  मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर निवेदनात घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाला मदत मिळावी तसेच परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.पँथर सेनेच्या नेत्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

No comments