म्युनिसिपल हायस्कुल फैजपूर येथे वार्षिक बक्षिस वितरण :: आ. अमोल जावळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमक...
म्युनिसिपल हायस्कुल फैजपूर येथे वार्षिक बक्षिस वितरण :: आ. अमोल जावळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय,फैजपूर येथे वार्षिक बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला
सदरहू कार्यक्रमास रावेर यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, सदर कार्यक्रमात आमदार अमोल जावळे यांनी विदयार्थ्यांना स्पेस टेक्नॉलॉजी सारख्या शाखेत कॅरीअर करावे, चाट जीपीटी, सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी चा चांगल्या प्रकारे वापर कसा करावा ते सांगितले, तसेच यश मिळविण्यासाठी चांगले संस्कारक्षम व्हा आणि विकसित भारत बनविण्यासाठी अभ्यास करावा अशाप्रकारचे मार्गदर्शन केले. तर कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव चे सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे हे अध्यक्ष होते. त्यांनी सेवा, संस्कार आणि साधना या तीन तत्वावर जीवन जगावे, आई, वडील, गुरु यांची सेवा करणे, विद्यार्थ्यांनी निरव्यसनी जीवन जगावे. आदर्श युवक आदर्श देश घडवून आपला देश विकसित, सर्व शक्तिवान बनवून आपला देश महासत्ता बनवु शकेल अशा शब्दात विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमात इ १० वीतुन प्रथम चंचल साळी, १२ वीतून प्रथम युक्ता गुजराथी तसेच शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मा आमदार अमोल जावळे, मा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, गट शिक्षणाधिकारी विश्वानाथ धनके पं स यावल, खरेदी विक्री संघाचे संचालक चंद्रशेखर चौधरी यांच्या हस्ते बक्षिसे वाटण्यात आले. सदरहू कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री एन पी पाटील, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री के टी तळेले सर, तर आभार उपशिक्षक जीवन पाटील सर यांनी केले. सदरहू कार्यक्रम साठी पर्यवेक्षक श्री एस ओ सराफ सर, ज्येष्ठ शिक्षक श्री सी एल धांडे , श्री ए के महाजन सर, श्रीमती नीलिमा वाघुळदे, श्री आर एन तडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तर श्रीमती, राजेश्री इंगळे, श्रीमती, अनिता सिसोदिया, श्री व्ही एम भोई, श्रीमती कल्पना होले, श्रीमती कविता सराफ, ललिता पाटील, श्री ए एस नेहते सर याचे सहकार्य लाभले. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

No comments