adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किनगाव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दुर्वेश पाटील, निकेश कोळी व खुशामत चांदणे यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.

  किनगाव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दुर्वेश पाटील, निकेश कोळी व खुशामत चांदणे यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी....

 किनगाव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दुर्वेश पाटील, निकेश कोळी व खुशामत चांदणे यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.


भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

डोणगाव किनगाव रोडवरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुलचा इ.७ वीचा विद्यार्थी दुर्वेश  दिगंबर पाटील व निकेश विजय कोळी यांची जिल्हास्तरीय कँरम स्पर्धेसाठी तर खुशांत ज्ञानेश्वर चांदणे यांची बुद्धिबळ स्पर्धेसाठी नुकतीच निवड करण्यात आली

 नुकत्याच तालुकास्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत यात इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगाव या शाळेतील १४,१७ व १९ या वयोगटातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतला असुन यात दत्त हायस्कूल चिखली येथे झालेल्या कँरम स्पर्धेत दुर्वेश दिगंबर पाटील आणि निकेश विजय कोळी यांनी प्रतिस्पर्धी खेळाळूवर विजय मिळवत जिल्हास्तरीय कँरम स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले तर खुशांत ज्ञानेश्वर चांदणे याने देखील बुद्धिबळ स्पर्धेत प्रतिस्पर्धीस मागे टाकत जिल्हास्तरावर आपले स्थान निश्चीत केले दुर्वेश,खुशांत व निकेश यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन व श्रीसंत तुकाराम महाराज सेवाभावी संस्था पंढरपूरचे अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील सचिव व संजीवन हॉस्पिटल डेक्कन,पुणे चे संचालक मनिष विजयकुमार पाटील स्व. चेतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका सौ.पूनम मनिष पाटील मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील उप मुख्याध्यापक सुहास भालेराव इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

No comments