पारितोषिक बक्षिसे विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ निर्माण करतात -पी.टी.महाजन मोठे वाघोदा येथे प्रकाश विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा स...
पारितोषिक बक्षिसे विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ निर्माण करतात -पी.टी.महाजन
मोठे वाघोदा येथे प्रकाश विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी पारितोषिके बक्षिसे ही प्रेरणादायी आहेत शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच शिक्षणाची ओढ आवड निर्माण होते व अभ्यासात गोडी निर्माण होते आजच्या घडीला विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले व बक्षिसास पात्र ठरले त्यांना हे बघून शैक्षणिक जिद्द आवड रुची निर्माण होत असल्याचे पी .टी.महाजन यांनी सांगितले मोठे वाघोदा येथे प्रकाश विद्यालय व ज्यूनियर काॅलेज मध्ये वार्षिक बक्षीस वितरण सोहळा आज दि. १ऑगस्ट रोजी संपन्न झाला सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. टी. महाजन हे होते तसेच व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन डी. के. महाजन, अध्यक्ष पी. टी. महाजन, सचिव किशोर पाटील, सहसचिव पी. एल. महाजन, विजयकुमार पाटील, राहुल पाटील,पी. व्ही. चौधरी, वसंत सुपे, मुरलीधर सुपे, कैलास पाटील, कुलदीप पाटील, जी. आर. महाजन, डॉ. गुरुदत्त पाटील, यासह सर्व संचालक उपस्थित होते. मुख्याध्यापक व्ही. एस. महाजन, पूर्व प्राथमिक च्या मुख्याध्यापिका योगिता नेमाडे, पर्यवेक्षक राजेश बडगुजर, यासह सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते यावेळी स्व. बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ रंग भरण स्पर्धांमध्ये विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व विविध स्पर्धा घेण्यात आले त्याचे देखील बक्षीस वितरण करण्यात आले तसेच १ते १२ वी मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आली. सुत्रसंचालन तेजस्विनी पाटील, आभार भावना पाटील यांनी व्यक्त केले.

No comments