चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा पक्षाला मोठे खिंडार चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यात राष्ट्रवाद...
चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा पक्षाला मोठे खिंडार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) कॉग्रेस आय पक्षाला राम राम ठोकत माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील गणपूर,माजी पंचायत समिती सभापती डि पी साळुंखे,माजी पंचायत समिती सदस्य अनिल पाटील लासूर,राजेंद्र पाटील वेले-आखतवाडे,अनवर्दे येथील सरपंच सचिन कोळी, उबाठाचे युवासेना जिल्हा उपप्रमुख डॉ रोहन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी मुंबई येथे जावून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहिर प्रवेश केला.या प्रवेशामुळे चोपडा तालुक्यातील आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुकीत नक्कीच कलाटणी मिळणार असल्याचे मत जाणकारांचे आहे. नव्याने राखीव झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणात समीकरणे जरी बदलतील परंतु अजून चोपडा तालुक्यात, शहरात अजून खिंडार पडणार असल्याची माहिती जाणकरांकडून मिळाली आहे.
सध्या महाराष्ट्रातील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, कॉग्रेस, उभाठा गटाचे शिवसेनेला दारूण पराभव झाल्यामुळे सत्ते सोबत जाण्याचा निर्णय नुकताच झालेल्या भाजपा प्रवेशामुळे दिसत आहे.
कारण ग्राम पंचायत असो किंवा इतर संस्था याच्या विकासासाठी सत्तेत असलेल्या पक्षा शिवाय पर्याय नाही. म्हणूनच जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी प्रवेश करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. चोपडा तालुक्यातील गणपूर, लासूर, धानोरा, वेले-आखतवाडे, अनवर्दे यासारख्या मोठ्या गावातील प्रमुख पदाधिकारी यांच्या भाजपात जाहिर प्रवेशामुळे त्या त्या गावातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला किती फायदा होतो हा येणारा काळच ठरवेल एवढे मात्र नक्की...!

No comments