हातेड परिसरात बिबट्याचा वावर, पिंजरा लावण्याची वरिष्ठांकडे मागणी गलंगी (ता चोपडा) मच्छिंद्र कोळी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मौजे हातेड...
हातेड परिसरात बिबट्याचा वावर, पिंजरा लावण्याची वरिष्ठांकडे मागणी
गलंगी (ता चोपडा) मच्छिंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मौजे हातेड खुर्द (ता चोपडा) शिवारात व परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असून त्याने दोन वासरूंचा फडशा पाडल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे शेतकरी व शेतमजूर धास्तावले असून सध्या शेतामध्ये मशागतीची कामे सुरू असतानाही भीतीपोटी मजुरांनी शेतात जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक चंद्रकांत सोनवणे व नागरिकांनी केली आहे. या बिबट्याचे दर्शनही काहींना झाले असून मजुरांमध्ये भीती पसरल्याने गेल्या आठ दिवसापासून मजुरांअभावी शेती कामेही थांबली आहेत. त्यामुळे या बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभागामार्फत पिंजरालावून त्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसे निवेदन नुकतेच वनपरीक्षेत्र अधिकारी, वनविभाग चोपडा ,जिल्हा उपवनसंरक्षक जळगाव, व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर चेतन सोनवणे यांच्यासह सुनील बाविस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, बाळकृष्ण बाविस्कर, बापूराव पाटील आदींच्या सह्या आहेत........ चोपडा.... वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देताना दीपक सोनवणे व शशिकांत पाटील

No comments