आदिवासी संस्कृतीचा जल्लोष मोहंमाडली आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनाचा थाटात उत्सव रावेर (प्रतिनिधी आदित्य गजरे ) (संपादक -:- हेमकांत गायकव...
आदिवासी संस्कृतीचा जल्लोष मोहंमाडली आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनाचा थाटात उत्सव
रावेर (प्रतिनिधी आदित्य गजरे )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोहंमाडली (ता. रावेर ) – "आदिवासी संस्कृती आमच्या मुळांमध्ये आहे, आणि मुळे जितकी खोल, वृक्ष तितकाच बळकट!" — हाच आत्मा साकारत मोहंमाडली आश्रमशाळेत 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात आला.या वेळी शाळेच्या परिसरात अगदी जत्रेसारखी रंगत निर्माण झाली होती. आदिवासी वेशभूषेतील चिमुकल्यांनी आणि युवक-युवतींनी जेव्हा पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सुरू केले, तेव्हा परिसरच भारावून गेला. त्यांच्या पायांच्या ठेक्यावर जमलेली उपस्थिती थक्क झाली.कार्यक्रमात लहानग्यांनी आदिवासी संस्कृती, इतिहास, आणि अभिमानावर भाषणे देऊन मन जिंकले. विशेष म्हणजे पारंपरिक दागिने, फेटे, वन्य वस्त्र, आणि रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून सादर केलेली सोंगटी आणि नृत्ये उपस्थितांची मने मोहित करून गेली.कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळा मोहंमाडली चे कर्तबगार मुख्याध्यापक श्री. नितीन भगाळे सर त्या सोबतच माध्यमिक मुखद्यापक श्री .कुमावत सर लाभले होते. आपल्या भाषणातून त्यांनी आदिवासी समाजाच्या शौर्य, संस्कृती आणि शिक्षणावरील भूमिकेला उजाळा दिला. यावेळी पोलीस पाटील रमजान तडवी, तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच उपसंपच कुर्बान तडवी व ग्रामपंचायत सदस्य जाहाबिर तडवी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.या विशेष दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळालाच, पण त्यातून आदिवासी अस्मितेला आणि संस्कृतीला देखील एक सशक्त व्यासपीठ मिळाले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. मोहंमाडली आश्रमशाळेने पुन्हा एकदा सिद्ध केले — आदिवासी परंपरा ही केवळ आठवण नव्हे, ती आमच्या जीवनशैलीचा अभिमान आहे!

No comments