adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींच्या आवळल्या मुसक्या :- मलकापुरांत पोलिसांची दमदार कामगिरी: पिस्तूल,जिवंत काडतूस हस्तगत..!! कराड शहर आणि डी.बी पथकांची कामगिरी !

 पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींच्या आवळल्या मुसक्या :- मलकापुरांत पोलिसांची दमदार कामगिरी:  पिस्तूल,जिवंत काडतूस हस्तगत..!! कराड शहर ...

 पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींच्या आवळल्या मुसक्या :- मलकापुरांत पोलिसांची दमदार कामगिरी:  पिस्तूल,जिवंत काडतूस हस्तगत..!! कराड शहर आणि डी.बी पथकांची कामगिरी !  


सौ. आरती पाटील ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मलकापूर येथे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींच्या कराड शहर पोलीस आणि डीबी पथकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत काडतूस असा एकूण 66 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जीवन शांताराम मस्के ( वय 30) रा. शुक्रवार पेठ कराड) असे आरोपींचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मलकापूर छत्रपती शिवाजी चौकात जीवन मस्के हा देशी बनावटीचे पिस्तूल घेवुन वावरत असल्याची माहिती कराडच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे स.पो.नि. अशोक भापकर यांना मिळाली होती. त्यांनी मलकापूर येथे सापळा लावून मस्के यांस अखेर ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीसुंदर पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अशोक भापकर पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार पो.ना. संतोष पाडळे, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, सज्जन जगताप,अनिल, स्वामी,संदीप कुंभार,पो.शि.धीरज कोरडे,अमोल देशमुख,दिग्वीजय सांडगे,पाटील,मुकेश मोरे,सोनाली पिसाळ आदीं पोलिसांनी या कारवाईक सहभाग घेतला.

No comments