जागतिक आदिवासी दिना निमित्त सांस्कृतिक रेलीचे आयोजन भरत कोळी यावल ति.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : ९ ऑगस्ट रोजी शनिवारी जा...
जागतिक आदिवासी दिना निमित्त सांस्कृतिक रेलीचे आयोजन
भरत कोळी यावल ति.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : ९ ऑगस्ट रोजी शनिवारी जागतिक आदीवासी दिनानिम्मत यावल शहरात सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .
आदिवासी टोकरे कोळी , महादेव कोळी मल्हार कोळी समाजाचा वतीने यावल येथे फैजपुर रोड लगत असलेल्या मनुदेवी माता देवीच्या मंदिरा जवळ आ. अमोल जावळे यांच्या हस्ते रॅलीचे उदघाटन करण्यात येणार असून आ. प्रा. चंद्रकात सोनवणे याच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे याच्या उपस्थित सांस्कृतिक रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे हि रेली यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया जवळ जाणार आहे तरी आदिवासी टोकरे कोळी मल्हार कोळी महादेव कोळी समाज बांधव मार्फत उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन सपकाळे (अंजाळे ) , उपाध्यक्ष मुकेश कोळी ( यावल ) विजय सपकाळे (किनगाव) व पदाधिकारी यांनी केले आहे.

No comments