हरघर तिरंगा २०२५ उपक्रमांतर्गत सैनिकांना पाठविल्या शुभेच्छा व राख्या मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जे ई स...
हरघर तिरंगा २०२५ उपक्रमांतर्गत सैनिकांना पाठविल्या शुभेच्छा व राख्या
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या "हर घर तिरंगा २०२५" या उपक्रमा अंतर्गत तथा दरवर्षी विद्यालयातून राबविला जाणारा "राखी अभिमानाची धागा शौर्याचा" या कार्यक्रमांतर्गत आज मुलींनी 18 महाराष्ट्र बटालियन जळगाव येथील सैन्यातील पदाधिकारी तथा सैनिक बांधवांना शुभेच्छा देऊन राख्या पाठविण्यात आल्या.भारतीय सैनिक तिरंगा ध्वज आणि देश रक्षणासाठी देत असलेल्या योगदानाची माहिती मुलांना व्हावी तसेच आपल्या देशाच्या रक्षणासाठी आणि तिरंगी ध्वजाच्या सन्मानासाठी सदैव तत्पर असणारे आपले भारतीय जवान त्यांचा त्याग आणि बलिदान अनमोल आहेत. त्याचे मोल आपण करू शकत नाही. म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आपले कर्तव्य समजून हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयातील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या सैनिक बांधवांना अशी अनोखी भेट म्हणून पाठविण्यात आली.
उपक्रमाची माहिती एस आर ठाकूर यांनी दिली तर व्ही डी पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रसंगी प्राचार्य व्ही एम चौधरी उपप्राचार्य, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.

No comments