सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कॉमेडियन एक्टर अंकुर वाढवे सर यांची सदिच्छा भेट भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेम...
सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कॉमेडियन एक्टर अंकुर वाढवे सर यांची सदिच्छा भेट
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सरदार वल्लभ भाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चला हवा येऊ द्या या हास्य विनोदी कार्यक्रमामधील हास्य कलाकार अंकुर वाढवे सर यांनी शाळेला भेट दिली . कार्यक्रमा प्रसंगी डॉ.प्रदीप माहेश्वरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीला तायडे मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला .सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व विद्यार्थ्यांसमोर कॉमेडी करून दाखवली . विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी विद्यार्थ्यांना कलाक्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .अर्चना चौधरी मॅडम यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments