adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विरावली–दहिगाव रस्त्यावर तरुणाची हत्या; दोन संशयित आरोपी पोलीस ठाण्यात हजर

 विरावली–दहिगाव रस्त्यावर तरुणाची हत्या;  दोन संशयित आरोपी पोलीस ठाण्यात हजर भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल ता...

 विरावली–दहिगाव रस्त्यावर तरुणाची हत्या; 

दोन संशयित आरोपी पोलीस ठाण्यात हजर


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील विरावली–दहिगाव रस्त्यावर शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. दोन तरुणांनी मिळून एका २१ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली असून, हत्या केल्यानंतर आरोपी मोटरसायकलसह थेट यावल पोलीस स्टेशनला हजर झाले. मयत तरुणाचे नाव इम्रान युनुस पटेल (वय २१, रा. सुरेश आबा नगर, दहिगाव, ता. यावल, मूळ गाव हनुमंतखेडा, ता. धरणगाव) असे आहे. इम्रान आपल्या मामाकडे दहिगाव येथे वास्तव्यास होता. त्याचा मृतदेह विरावली–दहिगाव रोडवरील खिरवा रस्त्यावर सापडला.

दरम्यान, हत्या केल्याचा आरोप असलेले दोन संशयित तरुण ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रविद्र कोळी (वय १९) हे पल्सर दुचाकी (एमएच-१९ ईएफ-३८५०) वरून थेट यावल पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व पुढील तपासाचे काम सुरू होते. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

No comments