अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपवले; पत्नी व प्रियकरासह तीन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल. लातूर जि. प्र.(उत्तम माने) (संपादक -:- हेमक...
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपवले; पत्नी व प्रियकरासह तीन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल.
लातूर जि. प्र.(उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उदगीर, (जि. लातुर) - ईच्छापूर्ती हनुमान मंदिराजवळ धक्कादायक खूनप्रकरण उघडकीस आले आहे. पत्नी व तिच्या प्रियकराने तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्नी व प्रियकरासह तीन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत हनुमंत जनवाडे (वय-४०) रा. पारकट्टे गल्ली हा आरोपी पत्नी पूजा हनुमंत जनवाडे हिच्या अनैतिक संबंधातील अडसर ठरत असल्याने तिने आपला प्रियकर सुनिल उर्फ पिंटु पाटील (रा. जानापूर, ता. उदगीर) व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांच्या मदतीने कट रचला. यानंतर हनुमंत याला जबरदस्तीने बुधवारी (ता. २७) रोजी सायंकाळी ऑटोमध्ये बसवून ईच्छापूर्ती हनुमान मंदिराजवळ नेण्यात आले. तेथे लोखंडी पाटी व इतर साधनांनी डोक्यावर, हातावर, पायावर, पिंडरीवर वार करून त्याचा निर्दय खून करण्यात आल्याची फिर्याद मयताचा पुतण्या विनोद धनराज जनवाडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिल्यावरुन पत्नी व प्रियकरासह तीन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भातलवंडे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. फिर्यादीच्या जबाबावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री देवकर यांच्याकडे देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पत्नी व प्रियकराने हातमिळवणी करून केलेल्या या खूनप्रकरणाची शहर व परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे. सदर मयत हा येथील एका प्रसिद्ध धाब्यावर आचारी म्हणुन काम करत होता. त्यामुळे तो मयत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
No comments