यावल तालुक्यात जि.प.व पं.स.च्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : लवकरच होऊ घातलेल...
यावल तालुक्यात जि.प.व पं.स.च्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता तालुक्यातील एकूण पाच जिल्हा परिषद गट तसेच १० पंचायत समिती गणा मधील इच्छुक उमेदवारांचे लक्ष आरक्षणाकडे लागले आहे तर दुसरीकडे राजकीय पक्षाच्या नेत्यासह इच्छुक उमेदवार व पक्षाच्या कार्यकर्त्यात निवडणूक हालचाली सुरुवात झाली आहे निवडणूक पूर्वतयारी म्हणून आतापासूनच इच्छुकातर्फ मोर्चे बांधणीस सुरुवात झाली आहे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लवकरात लवकर घेण्यात याव्या या आदेशानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे तर या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील प्रभाग रचना तयार झाली आहे काही ठिकाणी घेण्यात आलेले प्रभाग रचनेच्या बाबतचे आक्षेपही फेटाळण्यात आले आहे त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गट व गणा च्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे गट व गणातील जागेचे आरक्षण हे लवकरच काढण्यात येणार असल्याचे समजते व त्यामुळे यावल तालुक्यातील एकूण पाच जिल्हा परिषद तसेच एकूण १० पंचायत समिती गण मधील जागेचे आरक्षण हे निश्चित केल्या जाणार आहे त्यामुळे या आरक्षणाकडे राजकीय पक्ष नेत्यासह इच्छुक उमेदवारांची तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे तर याबाबत आतापासूनच निवडणूक हालचालीस इच्छुकांनी सुरुवात केली आहे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील जागेचे आरक्षण लवकरच काढण्यात येणार आहे अशा परिस्थितीत निघणाऱ्या आरक्षणावर अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे
दुसरीकडे यावेळी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ह्या अतिशय काट्याच्या लढतीचे तसेच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची निवडुणूक साडे तीन वर्षा नंतर होत असुन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत आहेत तर आरक्षण जाहीर झाल्यावर अजून राजकीय हालचाली गतीमान होणार आहे त्यामुळे निवडणुका जसा जवळ येत आहे त्याप्रमाणे पक्ष तालुका , गट निहाय मेळावे आयोजित करून जनसंपर्के वाढविण्यावर भर पडत आहे.
साकळी - दहीगाव जिल्हा परिषद गट व साकळी - मनवेल पंचायत समिती गण गणातील आरक्षण काय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इच्छुक उमेदवार साडे तीन वर्षा पासून गट व गणात मतदारांच्या संपर्कात आहे मात्र आरक्षण जाहिर झाल्यावर उमेदवार संपर्कावर भर देतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
No comments