मुस्लिम समाजात आदर्श विवाह साखरपुड्याला आले अन् लग्न लावून गेले रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर शहरातील ...
मुस्लिम समाजात आदर्श विवाह
साखरपुड्याला आले अन् लग्न लावून गेले
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर शहरातील नागझीरी भागातील रहिवासी मोहम्मद एजाज़ मोहम्मद रफीक यांच्या मुलगा मोहम्मद ऊबैद मोहम्मद एजाज़ याच्या साखरपुड्यासाठी गेले असता तिथून थेट लग्न लावून आले. असून परिसरात त्यांच्या या कार्याचा भरभरून कौतुक होत आहे.सध्या मुस्लिम समाजामध्ये साध्या पद्धतीने व कमी खर्चयात लग्न समारंभ पार पाडण्याची सवय प्रत्येकात निर्माण होण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.इस्लाम धर्मातील प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.अ.स ) यांच्या शिकविण्यास अनुसरून लग्न हे साध्या पद्धतीनेच करण्याचे सांगितले आहे.लग्न ठरविण्याच्या वेळी काही भागात हुंडाप्रथा म्हणजे मुलाच्या कुटुंबाकडून पैशे ठरवले जातात.हा एक प्रकारचा सौदा आहे ? तसेच मागून हुंडा घेणे हे कायद्याने गुन्हा सुद्धा आहे.हुंडाप्रथा हे समाजाला काळिमा फासणारी प्रथा आहे या वर पूर्णपणे बहिष्कार टाकावा या उद्देशाने परिसरात प्रत्येष्ठित नागरिकांनी कमी खर्चयात तसेच मुलींच्या कुटुंबांवर जास्त भर नको ही संकल्पना समोर ठेऊन आता साखरपुड्यातच लग्न संपन्न ह्यावा या वर भर दिले आहे.रावेर शहरातील मोहम्मद ऊबैद मोहम्मद एजाज़ *रावेर शहरातील पत्रकार आणि ऑल इंडिया आयडियल टीचर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ शेख सलीम यांची *भाशी* व रावेर शहरातील पाणी टाकी जवळील रहिवासी सैय्यद अफसर सैय्यद अकबर यांची मुलगी मिस्बा सैय्यद अफसर दि १७/०८/२०२५ रविवार रोजी डी एम मॅरेज हॉल येथे साखरपुड्या साठी आले असता रावेर शेख सलीम शेख अमीर, सैय्यद अख्तर, वसीम खान (निंभोरा) शेख अकील(फैजपुर) , शेख रईस(फैजपुर) सैय्यद अयफाज ,
शेख लतीफ, मोहम्मद मकसुद, शेख सलीम (रसलपुर), मोहम्मद मुरसलीन, शेख नदीम, शेख सलीम आदींनी
वधू व वर यांच्या कुटुंबाला साखरपुड्यातच लग्न संपन्न करा अशी सल्ला दिली असता दोन्ही किटुंबांनी यात सहमती दर्शविली असता . येथे साखरपुड्याचा रूपांतर लग्न झालं.या प्रकारे त्यांनी समाजात एक आदर्श विवाह झाला. त्यांच्या या कार्याची परिसरात भरभरून कौतुक होत आहे.

No comments