घुस्सर येथे बस फेरी सुरु करण्यात यावी नागरिकांची आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदना द्वारे मागणी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत...
घुस्सर येथे बस फेरी सुरु करण्यात यावी नागरिकांची आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदना द्वारे मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोताळा:- शाळेकरी विद्यार्थी दाताळा तसेच मलकापूर येथे मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत असून त्यांना शाळेच्या वेळात सकाळी दहा वाजता वेळेवर बस नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यात मलकापूर येथे बाजारपेठ असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मलकापूरला गावातील नागरिकांना जाणे येणे करावे लागते याकरिता मलकापूर येथून घुसर गावापर्यंत नवीन बस सुरू करण्यात यावी तसेच नुकतेच दाभाडी येथून नवीन बस सुरू झाली आहे त्या बसची फेरी घुस्सर मार्गे करण्यात यावी तसेच मलकापूर ते धामणगाव बढे जाणाऱ्या सर्व गाड्या घुस्सर मार्गी गेल्यास विद्यार्थी व गावकऱ्यांच्या सोयीचे होईल व त्रास कमी होईल या संदर्भात मलकापूर आगार व्यवस्थापक यांना गावकरी व विद्यार्थी समवेत निवेदन देण्यात आले यावेळी राजेश जाधव,ओम जाधव,संजय सुरेश जाधव,विश्वनाथ गाडेकर,अतुल मुके,मनोहर मुके,अविनाश जाधव, विजय बगे उपस्थित होते.

No comments