adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमरावती हादरले, महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांची हत्या प्रकरणात :- फ्रेजरपूरा पोलिसांनी तपास गतिमान केला आणि पतीलाच ठोकल्या बेड्या..!!

 अमरावती हादरले, महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांची हत्या प्रकरणात :- फ्रेजरपूरा पोलिसांनी तपास गतिमान केला आणि पतीलाच ठोकल्या बेड्या..!! ...

 अमरावती हादरले, महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांची हत्या प्रकरणात :- फ्रेजरपूरा पोलिसांनी तपास गतिमान केला आणि पतीलाच ठोकल्या बेड्या..!! 


संभाजी गिरी गोसावी (अमरावती जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अमरावती येथील फ्रेरजपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येमुळे संपूर्ण शहरांत एकच खळबळ उडाली होती. (1ऑ ) रोजी संध्याकाळी घरात घुसून नकाबपोश आरोपींनी गळा दाबून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला होता. एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. आशा घुले ( वय 28) असे या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर पतीनेच त्यांच्या हत्येचा कट रचला होता. असे पोलीस तपासात समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी पती राहुल तायडे याला फ्रेरजपुरा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे... आरोपी हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे. राहुल तायडेनेच आपल्या पत्नीचा दोन मित्राच्या मदतीने आशा घुले यांचा गळा दाबून हत्या केली आहे. आरोपी पतीने एक महिन्यांपूर्वी पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. आरोपी राहुल तायडे याचे एका महिलेची प्रेम संबंध होते. यातूनच पती-पत्नीमध्ये अनेकदा खटके उडत होते.4-5 वर्षापासून आरोपींचे महिलेशी प्रेम संबंध सुरू होते. यापूर्वी या प्रकरणात आशा घुले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. (आरोपी पतीने रचला चोरीचा बनाव) आशा घुले यांचा मृतदेह त्यांच्या अमरावती मधील घरात आढळून आला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली मात्र या प्रकरणातील आरोपी शोधून काढण्यात फ्रेरजपुरा पोलिसांना यश मिळाले आहे.

No comments