वसई विरार महानगर पालिके अंतर्गत स्वातंत्र्यदिनानिमित्त बचत गटांसाठी विविध स्टॉल चे आयोजन वसई विरार प्रतिनिधी:- मनिषा जाधव (संपादक -:- हेमक...
वसई विरार महानगर पालिके अंतर्गत स्वातंत्र्यदिनानिमित्त बचत गटांसाठी विविध स्टॉल चे आयोजन
वसई विरार प्रतिनिधी:- मनिषा जाधव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वसई विरार महानगर पालिका दिनदयाळ अंत्योदय योजना DAY NULM विभाग अंतर्गत बचत गटातील महिलांसाठी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त; दिनांक १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट असे ३ दिवसासाठी, सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये महिलांनी स्वतः बनवलेली उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली आहे.
महानगरपालिकेने जनतेस आव्हान केले आहे की आसपासच्या परिसरातील लोकांनी बचत गटांच्या स्टॉल ला भेट द्यावी व खरेदी करून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे.

No comments