चोपडा येथे ग.स.शाखेतर्फे जेष्ठ सभासद सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.. (नगररचना अधिकारी कु.प्रेरणा बाविस्कर व सहाय्यक गटविकास अधिकारी कु.वैभव...
चोपडा येथे ग.स.शाखेतर्फे जेष्ठ सभासद सन्मान सोहळा उत्साहात संपन्न..
(नगररचना अधिकारी कु.प्रेरणा बाविस्कर व सहाय्यक गटविकास अधिकारी कु.वैभवी ठाकरे यांचा विशेष सत्कार)
चोपडा (प्रतिनिधी):-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
ज.जि.स.नो.स.प.लि.जळगाव (ग.स.संस्था) शाखा चोपडा तर्फे येथील रोटरी सभागृहात जेष्ठ सभासदांचा सन्मान व गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी सुमारे १०० जेष्ठ सभासदांना रू.५००१/- मात्रचा चेक व ५० गुणवंत पाल्यांना रू.२५१/- मात्रचे रोख बक्षीस, प्रमाणपत्र, ट्राफी, पेन, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग.स.चे माजी संचालक रमेश शिंदे हे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष आर.एच. बाविस्कर, विद्यमान अध्यक्ष अजबसिंग पाटील, विद्यमान संचालक सुनील सूर्यवंशी, मनोज पाटील, महेश पाटील, योगेश सनेर, मंगेश भोईटे, एकनाथ पाटील, संचालिका श्रीमती.प्रतिभा सुर्वे, माजी संचालक देवेंद्र पाटील, सभासद सतिष बोरसे, निलेश पाटील, व्हि.पी.चौधरी, कैलास माळी, विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्थानिक संचालकांच्या शुभहस्ते यथोचित सत्कारही करण्यात आला. प्रास्ताविक मंगेश भोईटे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश शिंदे, संस्थेचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, संचालक योगेश सनेर, महेश पाटील, जेष्ठ सभासद व्हि.पी.चौधरीसर यांनी संस्थेच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. याप्रसंगी संस्थेच्या सभासद व म.गांधी प्राथ.विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती. सुरेखा श्रीराम कोळी यांची मुलगी कु. प्रेरणा प्रेमनाथ बाविस्कर हिची अर्जुनी मोरगाव नगरपंचायत (जि.गोंदिया) येथे नगररचना अधिकारी वर्ग -२ ह्या पदावर नियुक्ती झाल्याने तसेच जेष्ठ सभासद राजेंद्र ठाकरे यांची मुलगी कु.वैभवी ठाकरे यांची सहा.गटविकास अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ सभासद बंधुभगिनी, गुणवंत पाल्य व पालक, अधिकारी, कर्मचारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक संचालक योगेश सनेर, मंगेश भोईटे, गुलाबराव पाटील, शाखाधिकारी दिलीप सपकाळे, श्रीमती.स्मिता मोरे, शरद पाटील, संजय पाटील, जगन्नाथ बाविस्कर यांचेसह सर्व कर्मचारी बंधुभगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचलन पत्रकार संजय बारीसर यांनी तर आभारप्रदर्शन रोखपाल उज्वल शिंदे यांनी केले.

No comments