यावल तेथे पिसाळलेल्या श्वानांची दहशत! काल्पनिक फाईल चित्र भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल शहरातील भगवा चौक, ...
यावल तेथे पिसाळलेल्या श्वानांची दहशत! 
काल्पनिक फाईल चित्र
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील भगवा चौक, वाणी गल्ली, बालसंस्कार शाळेजवळ गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा त्रास वाढला आहे. दिवसा किंवा रात्री या भागातून जाणाऱ्या नागरिकांना श्वानांच्या (कुत्र्यांच्या) टोळक्यांचा सामना करावा लागतो.
विशेषतः शाळकरी मुलांना शाळेत ये-जा करताना भीतीचा माहोल निर्माण झाला आहे. अनेक वेळा श्वानांच्या (कुत्र्यांच्या) भांडणामुळे रस्त्यावर गोंधळ उडतो व त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, "लहान मुलांना खेळायला बाहेर सोडताना आता भीती वाटते. श्वानांचे टोळके अचानक समोर आले की मोठेही घाबरून जातात."
परिसरातील नागरिक आता एकच मागणी करत आहेत की, या वाढत्या श्वानांच्या दहशतीवर काहीतरी उपाय नक्की व्हावा, अन्यथा मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल
No comments