यावल महाविद्यालयात 'आहार व आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
यावल महाविद्यालयात 'आहार व आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तसेच जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आहार व आरोग्य मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन संपन्न झाले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन व्ही .एस.नाईक महाविद्यालय रावेर येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अविनाश सोनार यांनी केले.
दरम्यान उद्घाटनाच्या सत्रात प्रमुख वक्त्या म्हणून ग्रामिण रुग्णालय यावल येथील डॉ. वैशाली निकुंभ यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार उपप्राचार्य डॉ हेमंत जी. भंगाळे विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. नरेंद्र पाटील विचारमंचावर उपस्थित होते.
उद्घाटक डॉ. अविनाश सोनार यांनी समतोल आहार कसा असावा हे सांगताना पुरेशा फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य, प्रथिने व दुग्धजन्य पदार्थ, मासे यांच्या सेवनासह व पुरेसं पाणी पिणं देखील आवश्यक आहे असे सांगितले.
आहाराचा परिणाम आपल्या व्यक्तीमत्वावर होतो हे पटवून देताना त्यांनी आहाराचे सत्व, रज आणि तम असे तीन प्रकार समजावून सांगत शक्य तितक्या प्रमाणात सात्त्विक आहार घेण्याचा सल्ला दिला.
डॉ. वैशाली निकुंभ यांनी आपल्या दैनंदिन आहारामध्ये विविधता असली पाहिजे असे सांगुन हलका आणि गरम आहार निरोगी असतो असे सांगत शीळं अन्न खाल्ल्याने आळशीवृत्ती बळावत असल्याचे सांगितले.
उत्तम आरोग्यासाठी
16-8 चा फार्मुला म्हणजे सोळा तास उपाशी राहून फक्त आठ तासांच्या दरम्यान अन्न सेवन केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी आपल्या दिवसाची सुरुवातच आरोग्यावर परिणाम करणाऱ्या केमिकल युक्त पेस्टने होते इतके आपण आधुनिकतेचे गुलाम झालो आहोत हे सांगताना विठोबा दंत मंजनचा 'बालपणीचा काळ' किती सुखाचा होता आणि आताचा पिझ्झा, बर्गरचा काळ मात्र मानवी आरोग्यावर काळासारखा तुटून पडला आहे म्हणून आताच आपण सावध होऊन संतुलित आहाराचा अंगीकार केला पाहिजे आणि आपले शारिरीक व मानसिक आरोग्य सुधारुन आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या पाहिजेत असे सांगून अध्यक्षीय समारोप केला.
कार्यशाळा घेण्यामागिल भुमिका प्रा. एम.डी. खैरनार यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केली.
सुत्रसंचाल प्रा. प्रतिभा रावते यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. हेमंत भंगाळे यांनी केले.
उपप्राचार्य डॉ हेमंत भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या सत्रात यावल पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी श्री डी.सी.पाटील, आरोग्य निरीक्षक श्री जयंत पाटील तसेच जीवन संजीवनी नॅचरोपॅथी भोर पुणे येथील कोच आणि लाईफ ट्रेनर श्री एजाज शेख यांची उपस्थिती लाभली होती.
श्री. डी. सी. पाटील यांनी आहार चांगला असेल तर आरोग्य चांगले राहते म्हणून सुदृढ आरोग्यासाठी वयानुसार आपला आहार असला पाहिजे असे सांगून शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक अनेक योजनांची माहिती देत त्यांचा लाभ कसा घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
श्री एजाज शेख यांनी प्रात्यक्षिकातून नाडी चिकित्सा करत वात,पित्त आणि कफ प्रवृत्ती कशी ओळखायची ते सांगत होते या तिन्ही प्रवृत्तीचा संबंध थेट आहाराशी असतो म्हणून आपला आहार नेहमी संतुलित असावा असे सांगितले
अध्यक्षीय मनोगतात डॉ हेमंत भंगाळे यांनी 'जसे खाल तसे दिसाल' या शास्त्राचा दाखला देऊन आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास आहारातच दडलेला आहे असे सांगून विद्यार्थ्यांना योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला. सुत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. रत्नाकर कोळी यांनी केले. दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते

No comments