तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज चे घवघवीत यश रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तालुकास्...
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज चे घवघवीत यश
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत १४, १७, १९ वयोगटाच्या मुले व मुलींच्या शासकीय बुद्धीबळ स्पर्धा सौ. कमलाबाई गर्ल्स हायस्कुल रावेर येथे पार पडल्या. त्यात १४ वर्ष वयोगटात मुलींमधुन हेमेश्वरी संजय काकडे तर मुलांमधुन यश संजीव येवले हे विजयी झाले. तसेच १७ वर्ष वयोगटात मनस्वी वैभव चौधरी, दिया नितीन महाजन व अक्षरा प्रदिप चौधरी या विजयी झाले. तसेच १९ वर्ष वयोगटातील चैत्राली ज्ञानेश्वर पवार व अपेक्षा संजय वाघोदे या विजयी झाल्या असून यासर्व खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. बी. टी. सपकाळे सर व श्री. जे. आर. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्या सर्व यशस्वी खेळाडूंचे श्री. चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी.टी.महाजन , उपाध्यक्ष श्रावण महाजन, चेअरमन डी.के.महाजन. व्हा.चेअरमन विजयकुमार पाटील सचिव किशोर जगन्नाथ पाटील सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ व मुख्याध्यापक व्हि एस महाजन पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
No comments