adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष ताकदीने लढणार

 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष ताकदीने लढणार  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- .हेमकांत गायकवाड) मलकापूर ...

 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष ताकदीने लढणार 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- .हेमकांत गायकवाड)

मलकापूर :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष ताकदीने लढणार असून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायतीवर प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी केले. 


आज २४ ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील शासकीय विश्राम गृह येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बच्चुभाऊ कडू हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जंजाळ, जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते,  जिल्हा संपर्क प्रमुख गजाननभाऊ लोखंडकर, जिल्हा उपप्रमुख अजय टप, शेगाव जिल्हा उपप्रमुख निलेश भोंगे, तालुका प्रमुख अजित फुंदे, दिव्यांग जिल्हा उपप्रमुख राजेश पुरी, नांदुरा तालुका प्रमुख कैलास मानकर, मलकापूर शहर उपप्रमुख बलराम बावस्कर, सौरभ बावस्कार संग्रामपूर, आकाश वानखेडे सोनाळा, बुलढाणा तालुकाप्रमुख गणेश काकडे, उप तालुकाप्रमुख गणेश जाधव, चिखली तालुका प्रमुख सुनिल वाघ, लोणार तालुका प्रमुख सुनिल साखरे, सिं.राजा तालुका प्रमुख आनंद इंगळे, धाड येथील ऋषि वाघ, संजय इंगळे, मुकेश राजपूत , मंगेश राऊत, दिलीप साखरे, केशव सनांसे, राहुल साळवे यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल येत्या काही महिन्यात वाजणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष हा पुर्ण ताकदीने बुलढाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्यामध्ये लढणार असून या निवडणुका आपणाला तेवढ्याच ताकदीने जिंकायच्या असून या स्थानिक स्थराज्य संस्थांवर प्रहारचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. तसेच आता वेळ कमी असून या निवडणुकांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार उतरविण्यासाठी लवकरच सक्षम अशा उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असून या निवडणुकांकरीता जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.या आयोजित बैठकीप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.  बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments