नयनरम्य पाल पर्यटन गार्डन मधील झुलता पुल मोजतोय शेवटची घटका... वनविभाग अन्नभिन? रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
नयनरम्य पाल पर्यटन गार्डन मधील झुलता पुल मोजतोय शेवटची घटका... वनविभाग अन्नभिन?
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील पाल पर्यटन क्षेत्र तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे याच पाल पर्यटन क्षेत्रात गार्डन एहट,प्राणी संग्रहालय हरिण पैदास केंद्रासह अभयारण्यात निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यास देशभरातील तसेच विशेष महाराष्ट्रातील पर्यावरण प्रेमी नेहमीच पर्यटनाच्या माध्यमातून हजेरी लावतात येथील पाल गार्डन बगीच्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असलेला झुलता पूल सध्या धोक्याच्या अवस्थेत पोहोचला असून मृत्युचा सापळा बनला आहे
पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सध्या पूल बंद ठेवण्यात आला असला, तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि वेळेवर देखभाल न झाल्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.व पर्यटकांची निराशा होते आहे देशभरातील
दरवर्षी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान सारख्या परराज्यातूनही पर्यटक पाल अभयारण्यात पर्यटनासाठी हजेरी लावतात.निसर्गरम्य पाल गार्डन,गारबर्डी धरण परिसर,जंगल सफारी, हिरव्यागार वनराईतून भटकंती आणि अभयारण्यात दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांचे दर्शन हे जसे आकर्षणाचे केंद्र आहे, तसेच विशेषतः पाल पर्यटन क्षेत्रात बगीच्यातील झुलता पूल या झुलता पुलावरून चालताना मिळणारा रोमांचकारी अनुभव हा या ठिकाणचा आकर्षण केंद्र मानला जातो. मात्र, सध्या झुलत्या पुलाच्या दोन्ही टोकांवरील लाकडी फळ्या बोथट झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत त्यांवर चालणे धोक्याचे झाले आहे. लोखंडी तारा गंजल्यामुळे पूल अधिकच असुरक्षित बनला असून बगीच्यातील हा झुलता पूल मृत्यूचा सापळा बनला आहे!
महिनाभरापूर्वी वन विभागाने अलीकडेच कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या थाटामाटात जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री, विद्यमान आमदार आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पाल पर्यटन क्षेत्रातील अभयारण्यात जंगल सफारी प्रकल्प सुरू केला आहे, परंतु तुलनेत अल्प खर्चात दुरुस्ती करता येणाऱ्या झुलत्या पुलाकडे मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याने पाल या निसर्गरम्य, नयनरम्य नावाजलेल्या पाल पर्यटन क्षेत्रातील बगीच्यात फिरायला येणारे अनेक पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत. काहींनी तर सोशल मीडियावर याबाबतीत नाराजी सह संताप व्यक्त करत, पर्यटनस्थळांची देखभाल नियमित करण्याची गरज अधोरेखित केली आहे असल्याचे बोलले जात आहे. झुलता पूलाच्या या दुर्दशेबद्दल मन मौज मस्ती निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येणारे निसर्गप्रेमी व स्थानीय नागरिकांसह पर्यटकांमधून उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी या विषयात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. पुलाची दुरुस्ती न केल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाला जबाबदारीने निर्णय घेण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्तेही या प्रकरणात सक्रिय झाले असून, मागील आठ-दहा वर्षांत झुलत्या पुलाच्या देखभालीसाठी किती निधी खर्च झाला, याची माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागवण्याचा विचार करत आहेत. निधी असूनही कामे न होणे हा प्रशासकीय हलगर्जीपणाचा भाग मानला जात आहे


No comments