जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस मोठ्या उत्साहात साजरा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम ...
जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस मोठ्या उत्साहात साजरा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा ता. रावेर, येथे जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन तसेच प्रमुख शिक्षक सौरभ तेली आणि संगीता ठोंबरे हे लाभले, कार्यक्रमाचे सूत्र संचलन गाईडच्या विद्यार्थीनी पलक पाटील आणि याशिका गुळवे यांनी केले
प्रास्ताविक गाईड शिक्षिका कल्पना वाणी यांनी केले, गाईडच्या विद्यार्थीनींनी बेडल पॉवेल तेरे बच्चे हम, गीत सादर केले, जागतिक स्काऊट स्कार्फ दिवसाचे महत्त्व शिक्षक सौरभ तेली यांनी सांगितले, तर विद्यार्थीनी आर्या भोलाने,लोकिता बोंडे यांनी भाषण दिले,आभार प्रदर्शन स्काऊट प्रशिक्षक प्रशांत सोनवणे यांनी केले, फलक लेखन कला शिक्षक खिलेश राणा व कांचन महाजन यांनी केले,

No comments