महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस पदी धनंजय चौधरी यांची नियुक्ती इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर यावल परिस...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस पदी धनंजय चौधरी यांची नियुक्ती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर यावल परिसरातील युवा नेते धनंजय चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या संघटनात्मक रचनेत नवीन विस्तार होण्याची अपेक्षा आहे. धनंजय चौधरी यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सातत्यपूर्ण कामाच्या जोरावर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासामुळे धनंजय चौधरी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

No comments