वीस दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाचे जोरदार आगमन. दोन दिवस सतत संततधार,अनेक जनावर गेले पाण्यात वाहून. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी - (संप...
वीस दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाचे जोरदार आगमन.
दोन दिवस सतत संततधार,अनेक जनावर गेले पाण्यात वाहून.
प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल तालुका व परिसरात गेल्या वीस दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाचे जोरदार आगमन होऊन सर्वत्र पाणी साचले आहे.शेतात,नवीन वसाहतीत भरपूर पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान गेल्या वीस दिवसांपासून एरंडोल तथा परिसरात पावसाने दडी मारली होती.शेतकऱ्यांसह नागरिक मोठ्या चिंतेत होते.पाऊस झाला नसता तर शेतात पाणी व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असती परंतु मोठ्या प्रतीक्षेनंतर दि.१५ व १६ तारखेच्या मध्यरात्री जोरदार पाऊस झाला.सर्वत्र पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. नविन वसाहतींमध्ये नगर पालिकेतर्फे नुकतेच नविन रस्ते तयार करण्यात आले असून या ठिकाणाचे रस्ते बनवितांना पाणी साचल्यावर त्याला बाहेर काढण्यासाठी कुठल्याही उपाय योजना केल्या नसल्याने अनेक ठिकाणी पाणी गुडघ्यापर्यंत साचले आहे.नागरिकांना नविन वसाहतींमध्ये नविन रस्त्यांवर रस्ता शोधावा लागत असून त्यांचे मोठे हाल होत आहे.यावेळी रामदास कॉलनी परिसरातील नागरिकांनी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यास सदर घटना कळवली असता त्याने आज रविवार असून सुट्टी आहे.त्यामुळे आज आम्ही काहीही करु शकत नसल्याचे उत्तर दिले.यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून आम्ही वेळेवर नगरपालिकेचा कर भरून असे उत्तर मिळत असल्याचे सांगितले.यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर नविन वसाहतींमध्ये तयार केलेल्या रस्त्यांवर पाणी काढण्यासाठी काहीतरी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.
रात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून काही ठिकाणी दुकानांमध्ये,व्यापारी संकुलात,शेतात,घरात पाणी घुसल्याने फार नुकसान झाले आहे.शासनाने त्वरित पंचनामे करुन मदत करावी अशी देखील मागणी जोर धरत आहे.
आमदार अमोल पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.टोळी येथे ३० ते ३५ घरांत तसेच भातखेडे येथे १५ ते २० घरांत पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे व घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील एरंडोल येथे एक गाय,एक म्हैस,सहा कोंबड्या,खडकेसीम येथे एक म्हैस,एक रेडकू,जवखेडेसीम येथे एक बैल,एक बकरी,एक कोंबडी,जवखेडे खु.येथे २ गायी,रवंजे खु.येथे दोन बैल,एक गाय निपाणे येथे एक बैल,एक गायीचे वासरू खडके बु.येथे एक बैल,पाच म्हैशी उमरदे येथे दोन बकऱ्या धारगीर खडके खु.येथे एक म्हैस,एक रेडकू, टोळी खु.येथील दोन बकऱ्या पावसात वाहून गेल्या.तालुक्यातील अंजनी प्रकल्पासह,भालगाव,खडकेसीम,पद्मालय येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.या जोरदार पावसामुळे शेतातील कपाशी,मका,सोयाबीन सह कडधान्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.प्रसनातर्फे पंचनामे सुरू झालेले आहे.

No comments