adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

  खडसे महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) 14 ऑगस्ट 2025 रोजी श्र...

 खडसे महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

14 ऑगस्ट 2025 रोजी श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली. एक्सलन्स ग्लोबल स्किल ट्रेनिंग अँन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या  सहयोगाने  सेबी नोंदणीकृत मार्केट ट्रेनर सौ. गौरी गीत (नाशिक)  यांनी आँनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना विविध गुंतवणूक साधनांची माहिती दिली. शेअर्स, बाँड्स, पी. पी. एफ., एफ. डी. तसेच सोनं यांसारख्या पर्यायांबरोबरच विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांची माहिती आणि त्यांच्याशी संबंधित जोखीम स्पष्ट करून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांना गुंतवणुकीत जोखीम व्यवस्थापन व नियोजनबद्ध आर्थिक शिस्तीचे महत्त्व पटवून देण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत महाजन सर, उपप्राचार्य डॉ. एस. बी. सालवे सर व डॉ. वंदना चौधरी यांची  विशेष उपस्थित होती. कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. अभिषेक पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. अतुल बढे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी ठरला आणि त्यांच्यात आर्थिक जागरूकतेचा नवा दृष्टिकोन निर्माण झाला.

No comments