शांतता, सौहार्द आणि एकतेने सण साजरे करा - डॉ. विशाल जयस्वाल रसूलपूर येथे हिंदू मुस्लिम शांतता समितीची बैठक संपन्न रावेर प्रतिनिधी मुबारक...
शांतता, सौहार्द आणि एकतेने सण साजरे करा - डॉ. विशाल जयस्वाल
रसूलपूर येथे हिंदू मुस्लिम शांतता समितीची बैठक संपन्न
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील रसूलपूर ला ५ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद मिरवणूक आणि ६ रोजी गणेश विसर्जन केले जाईल ६ रोजी मिरवणूक आणि गणेश विसर्जन केले जाईल. रसलपूर येथे येणाऱ्या ईद मिलाद-उन-नबी, गणेश उत्सवासाठी शांतता समितीची बैठक रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पीएसआय तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी उपस्थित मान्यवरांना रसलपूर गावात बंधुता, एकता, अखंडता आणि सौहार्द राखण्याचे आणि सर्व सण आनंदाने ,सद्भावना, एकता, शांतता आणि सौहार्दपूर्णतेने साजरे करण्याचे आवाहन केले. हे आवाहन स्वीकारत रसलपूर, रमजीपूर, बक्षीपूर खिरोदा या गावांमध्ये ५ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद उत्सवाची मिरवणूक आणि ६ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात येईल.
यावेळी प्रदेश भाजप प्रदेश सदस्य सुरेश भाऊ धानके, मुस्लिम पंच अध्यक्ष आयुब पहेलवान. माजी रसलपूर सरपंच हनिफ पहेलवान. माजी सरपंच अनिल भाऊ चौधरी. दिलीप धानके, लक्ष्मण मोपारी खिरोदा. सुनील महाजन बक्षीपूर. सुभाष वानखेडे. उमाकांत महाजन रामजीपूर. प्रशांत वाणी समाधान काळे. सलीम सदस्य.रमेश चौकसे. इसाक बेग. इस्माईल खान. अस्लम सेठ. प्रवीण पोलीस पाटील रसुलपूर. विजय पोलीस पाटील खिरोडा. राहुल पोलीस पाटील बक्षीपूर. समीर तडवी पोलीस पाटील रमजीपूर. अशोक महाराज. हवालदार सिकंदर तडवी योगेश पाटील कॉन्स्टेबल. आणि गणेश विसर्जन पथकाच्या मंडळ अध्यक्षांसह सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments