अंजाळे नूतन विद्यामंदिर येथे शाडूमाती पासून गणेशमूर्ती तयार करण्याबाबत कार्यशाळा व प्रात्यक्षिक भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेम...
अंजाळे नूतन विद्यामंदिर येथे शाडूमाती पासून गणेशमूर्ती तयार करण्याबाबत कार्यशाळा व प्रात्यक्षिक
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल : नूतन विद्या मंदिर, अंजाळे येथे राष्ट्रीय हरितसेना तर्फे मातीचा गणपती बनविणे कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. गणेशोत्सवाच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्यशाळेस मुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा झोपे तसेच शिक्षक डी. व्ही. बोरोले, मनोज चौधरी, श्रीमती ज्योती परखड, जितेंद्र धांडे आणि उल्हास पाटील यश चौधरी, पराग चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेत कला शिक्षक श्री. सुनील सोनवणे यांनी मातीपासून गणेशमूर्ती कशा प्रकारे घडवायच्या याचे प्रत्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. त्यांनी सणासुदीच्या काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा मातीच्या गणपतींचे महत्त्व पटवून दिले. पर्यावरणाचे रक्षण, पाण्याचे संवर्धन आणि निसर्गाशी सुसंगत राहून सण साजरा करण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सण साजरा करताना फक्त आनंदच नव्हे तर निसर्गाची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हा संदेश सर्वांना देण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजन राष्ट्रीय हरितसेना प्रमुख श्री. लिलाधर वानखेडे सर यांनी केले . त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने मातीच्या गणेशमूर्ती घडवून एक वेगळाच अनुभव घेतला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरणाबद्दलची जाणीव, तसेच निसर्गाशी एकरूप होऊन सण साजरा करण्याची प्रेरणा निर्माण झाली.

No comments