विजेचा शॉक लागून विरोदा येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील मांगी ...
विजेचा शॉक लागून विरोदा येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू !
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मांगी येथील शेती गट नंबर १३१ मधील ट्युबवेल ची मोटार चालू करत असताना त विजेच्या तारांचा. इलेक्टीक शॉक लागल्याने योगेश गंगाधर चौधरी वय ५० या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सविस्तर असे की यावल तालुक्यातील विरोदा येथील तरुण शेतकरी योगेश कृषी केंद्र संचालक - योगेश गंगाधर चौधरी वय ५० हे रावेर तालुक्यातील मांगी शेती शिवारात गट नो. १३१ ता रावेर येथील शेतात गेला असता शेतातील ट्युबवेल ची मोटार चालू करत असताना त्यांना विजेच्या तारांचा. इलेक्टीक शॉक लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटर भुसावळ येथे दाखल केले होते मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने डॉ. अजय राख ट्रॉमा केअर सेंटर भुसावळ यांचे खबरी वरून सदर बाबी भुसावळ तालुका पो.स्टे.अ.मू. रजि. नं. ००/२०२५ बी एन एस एस २०२३ चे कलम १९४ अकस्मात मृत्यु रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन सदर अ.मू.चा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक भुसावळ यांचे आदेशान्वये पोहको २०६९ विकास बावीस्कर यांना दिला आहे. दाखल अंमलदार, पोहेको/१९९ कैलास बावीस्कर यांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील सावदा सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गनिर्देशन पोलीस कॉ्स्टेबल पोहेकर तपास करीत आहेत..

No comments