adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रामशेठ ठाकूर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक - चंद्रकांत दळवी मुलांच्या वसतिगृहासाठी रामशेठ ठाकूर यांचेकडून ५० लाखाची देणगी जाहीर

  रामशेठ ठाकूर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक - चंद्रकांत दळवी  मुलांच्या वसतिगृहासाठी रामशेठ ठाकूर यांचेकडून ५० लाखाची देणगी जाहीर   शौक...

 रामशेठ ठाकूर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक - चंद्रकांत दळवी 

मुलांच्या वसतिगृहासाठी रामशेठ ठाकूर यांचेकडून ५० लाखाची देणगी जाहीर  


शौकतभाई शेख / श्रीरामपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सातारा -  "कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वावलंबी शिक्षणाचा धडा घेऊन व प्राचार्य बापूसाहेब उनउने यांच्या संस्काराचा आदर्श गिरवत स्वकर्तृत्वाने शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात यशस्वी झालेल्या रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक कार्य  प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले आहे.

सातारा शहरातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागांतर्गत थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर  व प्राचार्य बापूसाहेब उनउने यांचे नातू श्री.अमोल उनउने व सौ. मीनल उनउने यांनी दिलेल्या देणगीमधून मा. रामशेठ ठाकूर अभ्यासिका, प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने स्मृती दालन व मराठी भाषा प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संपन्न झाला. मराठी विभागाला दिलेल्या देणगीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व अमोल उनउने व सौ. मीनल उनउने तसेच कॉन्ट्रॅक्टर पांडुरंग मासाळ व आर्किटेक्चर पुरुषोत्तम पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला.      

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले.  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

               रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, जी. के. बापू, सौ. मंगलताई पाटील इत्यादी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

             विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की " छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थी जीवनामध्ये कमवा शिका योजनेत कष्ट करून स्वावलंबी शिक्षण घेत  ज्ञानसाधना केली. प्राचार्य बापूसाहेब उनउने तपस्वी प्राचार्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांना  रामशेठ ठाकूर यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली आहे. तसेच प्राचार्य बापूसाहेब उनउने यांचे नातू श्री.अमोल उनउने यांनी आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभागाला विशेष देणगी देऊन आपल्या आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या देणगीदारांचे सामाजिक कार्य आजच्या युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायक आहे." असे  प्रतिपादन त्यांनी यावेळी  केले.

         कार्यक्रमात ॲड.भगीरथ शिंदे, कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डी ए माने व सौ. मीनल उनउने यांनी आपल्या मनोगतातून प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने यांच्या आठवणींना आत्मिक उजाळा दिला.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या नावडकर यांनी केले तर डॉ. आबासाहेब उमाप यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य रामराजे माने देशमुख, डॉ. सविता मेनकुदळे, डॉ. राजेंद्र तांबिले, डॉ. संदीप किर्दत, डॉ. वर्षा माने, डॉ. महादेव चिंदे, डॉ. राज चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील डॉ. संजय सरगडे, प्रा. प्रियंका कुंभार, प्रा. श्रीकांत भोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

वृत्त विशेष सहयोग

सौ.मिनल उनउने - सातारा 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments