adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुंजलवाडी शेत शिवारात वीज पडून तरुण मेंढपाळाचा मृत्यू :चार जखमी,पांच मेंढ्याही ठार रावेर तालुक्यातील घटना परिसरात हळहळ

 मुंजलवाडी शेत शिवारात वीज पडून तरुण मेंढपाळाचा मृत्यू :चार जखमी,पांच मेंढ्याही ठार रावेर तालुक्यातील घटना परिसरात हळहळ   रावेर प्रतिनिधी मु...

 मुंजलवाडी शेत शिवारात वीज पडून तरुण मेंढपाळाचा मृत्यू :चार जखमी,पांच मेंढ्याही ठार

रावेर तालुक्यातील घटना परिसरात हळहळ  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शेत शिवारात असलेल्या चुनाबर्डी परिसरात काल रात्री झालेल्या विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसात विज पडून दादा कोळपे (वय २०, रा.लालमती चुनाबर्डी पाड्या) या तरुण मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे. एक दुर्दैवी घटना घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे आठच्या सुमारास रावेर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची सुरूवात झाली. याच दरम्यान दादा कोळपे हे आपल्या कुटुंबासह पाड्यावर थांबले होते. अचानक विज पडल्याने ते जागेवरच कोसळले.या घटनेत चार जण जखमी तर पांच मेंढ्या ही दगावल्याची आहे या युवकाला कुटुंबीयांनी तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.जखमीवर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर कोळपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच बाळा आमोदकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या टीमने मृतकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सध्या परिसरात शोककळा पसरली असून पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या धोक्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments