आडगाव ला कानबाई उत्सव व विसर्जन. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा (दि.५) तालुक्यातील आडगाव येथे दशा माता व कानबाई उत्सव ...
आडगाव ला कानबाई उत्सव व विसर्जन.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा (दि.५) तालुक्यातील आडगाव येथे दशा माता व कानबाई उत्सव उत्साहात व आनंदात पार पडला. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दशामाता व दुसऱ्या रविवारी कानबाई (रोट) उत्साहात करण्यात आले.
कानबाई निमित्त गावात स वाद्य मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी कानबाई ची पूजन करण्यात आले. मीरा ज्ञानेश्वर पाटील, अलका प्रवीण पाटील, मनीषा गजानन पाटील, सौ. लावण्या, महेंद्र सौ. पुनम, सौ. शारदा, सो ज्योती सौ इंदू ,सौ.रेखा या व इतर शेकडो महिलांनी कानबाई उत्सवात भाग घेतला. अनिल शिंपी परिवारात दशामाता देवीची स्थापना करण्यात आली होती तिचेही विसर्जन कानबाई आधी करण्यात आले. कानबाई उत्सवासाठी सुरत, पुणे, मुंबई, नाशिक येथूनही काही कुटुंब या धार्मिक कार्यात सहभागी झाला होता.


No comments