adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ ज्ञानदेव दातीर यांची प्रदेश सहसचिव पदी बिनविरोध निवड

 डॉ ज्ञानदेव दातीर यांची प्रदेश सहसचिव पदी बिनविरोध निवड    रविंद्र कोळी प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  जळगांव:- पशुचिकित्सा व्यवसा...

 डॉ ज्ञानदेव दातीर यांची प्रदेश सहसचिव पदी बिनविरोध निवड   


रविंद्र कोळी प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जळगांव:- पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र  राज्य कार्यकारिणीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम मध्ये नाशिक विभागातून डॉ ज्ञानदेव दातीर यांची प्रदेश सहसचिव (नाशिक विभागीय सचिव) पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथील कामधेनू सभागृहात आयोजित आमसभेत त्यांचा सत्कार जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री उमेशचंद्र चिलबुले, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संजय पाटील पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील तसेच सरचिटणीस डॉ.मारोती कानोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.चोपडा स्थित डॉ.दातीर यांनी यापुर्वी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभाळली आहे.ते सध्या पशुवैद्यकीय दवाखाना बोरअंजटी ता.चोपडा येथे सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल  डॉ.रमण गावीत (विभागीय उपाध्यक्ष)डॉ.गणेश पाटील(जिल्हाध्यक्ष जळगाव) डॉ.संदीप पाटील,डॉ. शांताराम पाटील (माजी विभागीय सहसचिव) डॉ.हेमंत कुमावत,डॉ.राहुल साळुंखे डॉ. डी.पी.कोतकर आदींनी सदर  निवडीबाबत अभिनंदन केले आहे

No comments