अमरावतीत पारंपरिक थाटात आदिवासी रॅली; झाक्या, नृत्य, अस्मितेचा जल्लोष अमरावती | प्रतिनिधी.... (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जागतिक आदिवासी...
अमरावतीत पारंपरिक थाटात आदिवासी रॅली; झाक्या, नृत्य, अस्मितेचा जल्लोष
अमरावती | प्रतिनिधी....
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जागतिक आदिवासी दिनानिमित्त येत्या शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी अमरावती शहरात पारंपरिक थाटात आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेली भव्य आदिवासी रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता राजकमल चौक येथून सुरू होणारी ही रॅली नेहरू मैदान मार्गे राणी दुर्गावती चौक येथे विसर्जित होईल. या रॅलीतून आदिवासी समाजाचा इतिहास, अस्मिता, संस्कृती आणि हक्कांची बुलंद साद उमटवली जाणार आहे.रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा,आदिवासी नृत्य, ढोल-ताशा, तसेच महापुरुषांच्या झाक्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहेत. विशेषतः तंट्या मामा भिल्ल, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती यांच्या जीवनगौरवावर आधारित झाक्या, युवक-युवतींच्या पारंपरिक पोशाखातल्या सादरीकरणासह, रॅलीमध्ये सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडणार आहे ही रॅली केवळ एक शोभायात्रा नसून, शिक्षण, रोजगार, आरक्षण, वनहक्क, आरोग्य आणि विस्थापन यांसारख्या आदिवासी समाजासमोरील ज्वलंत प्रश्नांवर जनजागृती करणारा एक लढ्याचा मंच आहे. रॅलीदरम्यान घोषणाबाजी, मुद्देसूद स्लोगन्स आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी फलकं झळकणार आहेतही केवळ रॅली नाही ही आहे आपल्या लढ्याची मशाल!अशा निर्धाराने रॅलीचे आयोजन होत असून,आयोजकांकडून विद्यार्थ्यांना, युवकांना, महिलांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी प्रत्येकाने स्वतःचे फलक, घोषणाबाजी व संवेदनशील मुद्द्यांवरील संदेश घेऊन रॅलीत सक्रिय भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या ऐतिहासिक रॅलीसाठी शहरातील अनेक आदिवासी संस्था, सांस्कृतिक गट, युवक संघटनांनी एकत्र येत तयारी सुरू केली असून, रॅलीदरम्यान आदिवासी लोककलेचा देखील उत्सव साजरा होणार आहे.अमरावती शहर हे यंदाच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त अस्मितेचा आवाज बनणार आहे.ही रॅली हे आदिवासी समाजाचे केवळ सांस्कृतिक प्रतिनिधित्व नसून, हक्कांसाठीच्या संघर्षाचा जिवंत साक्षात्कार ठरणार आहे

No comments